तुमच्या पाश्चात्त्य जन्मकुंडलीचा PDF अहवाल
प्रीमियम पाश्चात्त्य अहवाल
तुमची पाश्चात्त्य जन्मकुंडली तुमचा स्वभाव आणि भावना यांविषयी काय सांगते? ग्रहांचा एकमेकांशी कसा संबंध आहे तेही पाहा.
₹९९९
एकदाच पैसे भरा. इंग्रजी PDF ईमेलने पाठवू. ती तुमच्या खात्यातही उपलब्ध असेल.
प्रीमियम पाश्चात्त्य अहवाल विकत घ्याअहवालात काय आहे
- तुमच्या जन्मकुंडलीचे चक्र
सायन (ट्रॉपिकल) कुंडलीत प्रत्येक ग्रह कोणत्या अंशावर आणि कोणत्या भावात आहे ते पाहा. कुंडलीतील मुख्य कोन उपलब्ध असतील, तर तेही दिले आहेत.
- स्वभाव आणि भावना
सूर्य, चंद्र, लग्न आणि जन्मावेळची चंद्रकला यांपैकी ज्या बाबींचे फलकथन दिले आहे, त्यांचा अर्थ समजून घ्या.
- ग्रह आणि भावस्वामी
कोणता ग्रह कोणत्या राशीत आणि भावात आहे ते पाहा. भावस्वामींचा परस्पर संबंध आढळल्यास त्याचीही नोंद आहे.
- ग्रहांचे कोनसंबंध आणि वक्री ग्रह
ग्रहांमधील कोनसंबंध पाहा. लागू असेल, तर ग्रहांचे राशिबल आणि वक्री गती यांवरील नोंदीही वाचा.
- संपूर्ण कुंडलीचे संकेत
अहवालात माहिती असेल, तर कुंडलीतील ग्रहांची एकूण मांडणी, तत्त्वांचे संतुलन आणि चंद्राच्या कक्षेचे पातबिंदू पाहा.
- परंपरेतील सूचना
तुमच्या कुंडलीनुसार सुचवलेले रुद्राक्षाचे पर्याय अहवालात असतील, तर ते पाहा.
अहवाल कसा मिळेल
- जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान नोंदवा. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि बिलासाठी लागणारे तपशीलही द्या.
- पैसे भरण्यापूर्वी त्याच पानावर किंमत तपासून घ्या.
- ऑर्डर देताना नोंदवलेल्या ईमेल पत्त्यावर आम्ही सुरक्षित लिंक पाठवू. त्या लिंकवरून PDF डाउनलोड करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
कोणत्या प्रकारची कुंडली मिळेल?
अहवालात पाश्चात्त्य सायन (ट्रॉपिकल) जन्मकुंडलीचे फलकथन आहे. भाव ठरवण्यासाठी कोणती पद्धत वापरली ते कुंडलीच्या पानावर दिले आहे.
जन्माची नेमकी वेळ माहीत नसेल तरी अहवाल मागवता येईल का?
हो. जन्माची नेमकी वेळ माहीत नसल्याचे फॉर्ममध्ये नोंदवा. जन्मस्थळाच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजताची जन्मवेळ धरून गणना केली जाते. लग्न, मुख्य कोन, भाव आणि जन्मवेळेवर अवलंबून असलेले इतर निष्कर्ष अंदाजे असतील.
मला काय मिळेल?
जन्मावेळीची ग्रहस्थिती आणि ग्रहांमधील कोनसंबंध दिलेला इंग्रजी PDF अहवाल मिळेल.
अहवाल पुन्हा डाउनलोड करता येईल का?
हो. ऑर्डर देताना नोंदवलेला ईमेल पत्ता वापरून साइन इन करा आणि अहवालांचा विभाग उघडा. तुमचा अहवाल ३६५ दिवस उपलब्ध राहतो.
अहवाल व्यवस्थित मिळाला असेल तर सहसा परतावा मिळत नाही. अहवाल मिळाला नसेल, त्यात दुसऱ्याची कुंडली असेल किंवा फाइल उघडत नसेल, तर परतावा धोरणात परतावा मागण्याच्या अटी आणि पद्धत पाहा.